Monday, August 27, 2007

श्रावणी सोमवार

श्रावणी सोमवार
करि अभिषेक शंकराचा
पाउस मुसळधार
भक्तिच्या सरीत भिजतो
श्रावणी सोमवार..

साफां-पगडी बांधुन
धारिला गळ्यांत सर्पहार
दर्शन देण्यास निघाले
केलासपति नंदीवर सवार..

पूजा-अर्चना-उपवास
करती नर-नार
विशेष इच्छापूरती साठी
धरला व्रत सोळा-सोमवार..

घरो-घरी आज
ब्राह्मण देव जेवणार
मनोभावे पूजियला देव
महादेव सर्वांना पावणार...

No comments: