Monday, August 27, 2007

तू

तुझ्यावर खूप दिवसापासून लिहायचे म्हणतो
पण तुझ्या साठी शब्द सापडत नाही
तुझा विषय निघाला की शब्द हरवतात
कारण तेव्हा मी , मी नसतो , आस्म्नतात तुला शोधत भरकटत असतो.

पण नेहमीप्रमाणे निराशा होते
हातातली सिगरेट पुन्हा भाणावर आणते

तू नसूनही कायम बरोबर असते
सुख दु:खाच्या हर एक क्षणी खांद्याला खांदा लावून असते
आनंदाच्या वेळी तुझा बेभानपणा भासतो
निराश मनाची समजूत काढणारी तूच असते

तुज़ी प्रतिमा मी रोज रंगवत असतो
तुझ्याशी मी बोलतही असतो
थट्टा , मस्करी आणि भांडनही होते

तरी तू कोण आहेस? कुठे आहेस? काही आहेस?
एक ना अनेक प्रश्न अजूनही अनूत्तरीत आहेस
पण एक दिवस तू समोर येणार आणि
तेव्हा मात्र शब्दांचा पाउस मुसळधार बरसनार.....

No comments: