Wednesday, August 29, 2007

हल्ली मला आवडत नाही तो...."

हल्ली मला आवडत नाही तो...."
"हल्ली मला आवडत नाही तो...."
काहीतरी विनोदी लिहीण्याचा प्रयत्न....

"हल्ली मला आवडत नाही तो...."

त्याचं काय आहे, प्रेम बीम करतो खूप...
पण प्रेमाने नुसत्या काय होणारेय??????

"राजा"ला हेच कसं काळत नाही? म्हणे
प्रेमाची भाजी अन् प्रेमाची भाकरी खाऊ..

कसं शक्य आहे?? सांगा ना तुम्हीच आता
त्याला काय चायणीजची सर येणारेय??

नाही,.. म्हणजे पहिले आवडायचे मलाही
त्याचे बोलणे,त्याच्या आवडी नि निवडी..

पण हल्ली खपत नाही मला सर्व हे...
तेच तेच बोलणं, अन् नको त्या आवडी..

म्हणे कविता लिहितो तुझ्यावर प्रेमाने..
आता लोणचे तरी होणारेय का कवीतेने??

ठीक आहे म्हणा, वेळ आलीच तर तो....
जीवाचीही पर्वा करणार नाही माझ्यासाठी..

पण त्याचा 'जीव' माझ्या, खरचं सांगते
काही म्हणजे काहीच उपयोगाचा नाही...

समजावून सांगते, विसरून जा मला..
तर म्हणतो,तू माझा प्राण आहेस जसा..

आता सांगा, प्राण असा देहाबाहेर असेल
तर हा जिवंत तरी राहील का असा?????

जाऊ दे, त्याला म्हणाले, जा आता बास
डोळ्यात पाणी आणून म्हणतो मला की,

तुज्यासाठीच माझा जन्म आहे खास..
त्याचं असलं बोलणं, खरच समजत नाही..

एक माहितेय मला पैश्याशिवाय काही नाही..
तुम्हाला म्हणून सांगते,सांगू नका कुणाला..

त्याच्या पेक्षा मला समोरचा "विन्या" आवडतो
चकणा असला तरी गॉगलणे कुठे कळतो???

रोज नवी जीन्स,नि जॅकेट रोज नव घालतो..
मस्त मस्त बाइक वर केस उडवत फिरतो..

एट त्याची काही औरच आहे, विचारू नका
त्या राजाला याची सर कधी येणारेय का???

याच्याकडे आहे मस्त बंगला आणि गाडी
राजाकडे त्या सायकालही नाही हो साधी...

विन्या तसा सगळ्या पोरिंवर लाईन मारतो
त्याच्या या अदेवर पण आपण खुषीने मरतो..

नाही म्हटलं बघू आता कसे काय जमतेय..
पण हल्ली तो आवडत नाही असं मी म्हणते

No comments: