Tuesday, August 28, 2007

"साक्षात्कार"

आई म्हणाली,
"अरे, जशी सुखं असंख्य आहेत
तशीच दुःखंही असंख्य आहेत,
ते सर्वस्वी तुमच्या मानण्यावर असते रे!!!
तुझ्यासाठीचे सुख
कुणासाठीचे तरी दुःख असते,
अन कुणाचे तरी दुःख
तुझ्यासाठीचे सुख!!"

अगं पण तरी यातुन सुःख
आणि दुःख ओळखायचं कसं???
"वेड्या तेच तर शोधत जगायचं असतं
या निळ्या आभाळाखाली,
अन ते जर मानवाला ओळखता आले असते तर....."

अन साक्षात मला आईच्या रुपात पुन्हा 'दत्त' भेटले होते!"

एकदम विचारपुर्ण आणि परिपक्व कविता आहे निलेश,
देव आणि आईचे माध्यम साधून जीवनातील खर्या सुख- दु:खाची ओळख करुन दिलीस!

No comments: