Monday, August 27, 2007

फक्त तुझ्यासाठी

फक्त तुझ्यासाठी
आयुष्य असेच सरले , धावत आठवणींच्या पाठी
सबंध आयुष्य वाट पाहत , मी फक्त तुझ्यासाठी
तुझ्या येण्याची वाट पाहत , शब्द गोठले आज ओठी
मनात दुखाचे भास कळवले, मी फक्त तुझ्या साठी
जगलो असा की मी , जगणे राहून गेले पाठी
डोल्यातील अश्रू मनात कोंडाले , मी फक्त तुझ्यासाठी
तुझ्यासमोर झुकते मन , हे मन ही आहे फार हाटी
याच हा टी मुळे आयुष्य बेतले, मी फक्त तुझ्याचसाठी
नशीबाची झगडत झगडत ,न तोडता प्रेमाची गाठही
त्या गाठही संभाळुन ठेवली, मी फक्त तुझ्यासाठी
एक एक क्षण तुझ्या प्रेमाचा , आज डोळ्यात दाति
त्या क्षणाना उराशि कवतावले , मी फक्त तुझ्यासाठी
अंधार विजत उजेड यावा , भान विसरून जुलावी मिठी
याच स्वप्नं ना आयुष्य समजले , मी फक्त तुझ्यासाठी
तुझीच वाट पाहत , जळाले मन प्रेमसाठी
भिन्न दिशाना झुरत राहिलो, मी फक्त तुझ्यासाठी