Tuesday, August 28, 2007

चंदन"

चंदन"

कधी कधी असही जगायच असत.
कधी असही वागायच असत.

खोट्या आनंदाच्या पडद्याआद.
खर दुःख लपवायच असत.

काही आठवायच असत.
काही विसरायच असत.

मनाच्या मखमली पेटीत.
काही स्मृतींना जपायच असत.

दुःखातही आपल्या आसवांना.
डोळ्यात आणायच नसत.

हसतमुखान इतरांच सांत्वन
करायच असत

दिवा बनून प्रकाश देत जळत
रहायच असत.

चंदन बनून झीजत झीजत.
आयुष्य संपवायच असत.

No comments: