Wednesday, August 29, 2007

हल्ली मला आवडत नाही तो...."

हल्ली मला आवडत नाही तो...."
"हल्ली मला आवडत नाही तो...."
काहीतरी विनोदी लिहीण्याचा प्रयत्न....

"हल्ली मला आवडत नाही तो...."

त्याचं काय आहे, प्रेम बीम करतो खूप...
पण प्रेमाने नुसत्या काय होणारेय??????

"राजा"ला हेच कसं काळत नाही? म्हणे
प्रेमाची भाजी अन् प्रेमाची भाकरी खाऊ..

कसं शक्य आहे?? सांगा ना तुम्हीच आता
त्याला काय चायणीजची सर येणारेय??

नाही,.. म्हणजे पहिले आवडायचे मलाही
त्याचे बोलणे,त्याच्या आवडी नि निवडी..

पण हल्ली खपत नाही मला सर्व हे...
तेच तेच बोलणं, अन् नको त्या आवडी..

म्हणे कविता लिहितो तुझ्यावर प्रेमाने..
आता लोणचे तरी होणारेय का कवीतेने??

ठीक आहे म्हणा, वेळ आलीच तर तो....
जीवाचीही पर्वा करणार नाही माझ्यासाठी..

पण त्याचा 'जीव' माझ्या, खरचं सांगते
काही म्हणजे काहीच उपयोगाचा नाही...

समजावून सांगते, विसरून जा मला..
तर म्हणतो,तू माझा प्राण आहेस जसा..

आता सांगा, प्राण असा देहाबाहेर असेल
तर हा जिवंत तरी राहील का असा?????

जाऊ दे, त्याला म्हणाले, जा आता बास
डोळ्यात पाणी आणून म्हणतो मला की,

तुज्यासाठीच माझा जन्म आहे खास..
त्याचं असलं बोलणं, खरच समजत नाही..

एक माहितेय मला पैश्याशिवाय काही नाही..
तुम्हाला म्हणून सांगते,सांगू नका कुणाला..

त्याच्या पेक्षा मला समोरचा "विन्या" आवडतो
चकणा असला तरी गॉगलणे कुठे कळतो???

रोज नवी जीन्स,नि जॅकेट रोज नव घालतो..
मस्त मस्त बाइक वर केस उडवत फिरतो..

एट त्याची काही औरच आहे, विचारू नका
त्या राजाला याची सर कधी येणारेय का???

याच्याकडे आहे मस्त बंगला आणि गाडी
राजाकडे त्या सायकालही नाही हो साधी...

विन्या तसा सगळ्या पोरिंवर लाईन मारतो
त्याच्या या अदेवर पण आपण खुषीने मरतो..

नाही म्हटलं बघू आता कसे काय जमतेय..
पण हल्ली तो आवडत नाही असं मी म्हणते

जुन्या आठवणी जागवायला,

तु परत येऊ नकोस
तु परत येऊ नकोस,
जुन्या आठवणी जागवायला,
आधीच खुप दिवस लागलेत,
मनावरील जखमा भरायला.....


दुःख अंतरी दाबुन,
एकांतामध्ये रडत असतो,
म्हणुनच का कोणास ठावुक,
सर्वांसोबत हसत असतो.....


तु आयुष्यात परत येऊ नकोस,
तुझे स्थान मिळवायला,
आधीच फार वेळ लागलाय,
त्या सर्व आठवणी विसरायला.....

पण...
काहीही असले तरी........


तुला शोधायला तरी,
नजर माझी फिरत असते,
आकाशीचा चंद्र पाहील्यावर,
तुझीच आठवण दाटुन येते......


तुला विसरण्याचा,
आत्ता कुठे मी प्रयत्न करतोय,
पण ही कवीता लिहीता लिहीता,
पुन्हा तुलाच गं मी आठवतोय...

for best friend

for best friend
तु फ़क्त सोबत रहा मित्रा
हे आयुष्य असचं जगुन घेईल...
मागितलंस कधि तर
सारं जगही जिंकुन तुला देईल.....

सुर्य ढळला....आता चंद्र येईल
अन सबंध आसमंत त्याच्या मंद प्रकाशात न्हाऊन जाईल...
माझ्याही शब्दांना मग उधान येईल
आठवुन तुला...
पुन्हा अशीच एखादी कविता जन्म घेईल...

तो रस्त्याच्या कडेला पडला होता

तो रस्त्याच्या कडेला पडला होता
उंची ५-४
वर्ण काळाशार

केस अर्धपिकलेले
वय वार्धक्याकडे झुकलेले

अंगावरचे निळे जर्किन विटलेले
काळी पँट पांढरा शर्ट जरासे फाटलेले

सकाळपासुन पाउस धो-धो कोसळत होता
रस्त्याकडेने पाण्याचा प्रवाह उसळत होता

सायकलवरुन तो कामाला चालला होता
हँन्डलला एक टिफीन अडकवला होता

अचानक मृत्यु त्याला भिडला होता
तो रस्त्याच्या कडेला पडला होता

चार बघे मग गोळा झाले
पहाता पहाता सोळा झाले

काही मौलिक चर्चा झडल्या
नजरा विचारात अन गढल्या

एक जण त्याचि बघतोय नाडी
एक जण जवळचा कांदाच फोडी

बहुतेकांना घाई कामावर जायची
पेंडींग कामे एकदाचि उरकायची

असेल भले तो मरायला टेकला
हे लचांड आपल्या मागे कशाला

तो अभागी निपचित पडुन होता
कोंडाळ्यातच गर्दीच्या दडुन होता

गर्दीचा उत्साह मावळु लागला होता
आँफिसमधला लेटमार्क दिसु लागला होता

एकएक जण घड्याळाकडे बघत पाय काढु लागला
सद्सद् विवेक बुद्धीला काहीना-काही समर्थन देऊ लागला

पहाता पहाता सारे निघुन गेले
रहाटगाडग्यात बुडुन गेले

पाऊस त्याला भिडला होता
तो रस्त्याच्या कडेला पडला होता


एकाकी
बाकी

प्रेम करायचं राहुन गेलं.

प्रेम करायचं राहुन गेलं.
पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे
आयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला, नाही म्हणाली तर
कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!... पण ते
कधी कळालचं नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

आकर्षण आणि प्रेम..!

आकर्षण आणि प्रेम..!
आकर्षण आणि प्रेम..
यात एक रेघ असते..
पुसट की ठळक ...
ती आपण मारायची असते..

प्रेमाकडे जाणारा रस्ता
आकर्षणाच्या बोगद्यातून जात ही असेल...
पण त्या गहि-या मोहजालात
तुला तुझा मार्ग खरच का गवसेल??

आकर्षणाला प्रेम समजून
आपण उगीच वाहून जातो..
पण. थोड्याच दिवसान्नी कळत...
खरतर अस काहीच नव्हत..

म्रुगजळाच्या मागे उगीच धावत असतो..
पण तो तर फ़क्त एक आभास असतो

ना. धों. महानोर

ना. धों. महानोर
विस्तीर्ण नदीचा काठ, पसरली दाट
फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट, कुणी सैराट
बावरा पक्षी

पाण्यात
एक साउली
हले बाहुली
थरकते ऊन
ही माल्हन म्हणते गान चंद्र माळून
बहकते रान.

झाडीत हूल बिथरते, गंध विखरते
फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट, कुणी सन्नाट

aathwan

हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव... आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही


मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

girlfriend

मलाही girl friend मिळावी ॥
सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,
आम्हा दोघांची मने जुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

हास्याच्या पहिल्या किरणाने,
प्रितीची खळी उमलावी ।
डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,
रूपाची ती राणी असावी ॥
अशीच माझी स्वप्नसुंदरी,
ह्र्दयाच्या नगरात रुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

चौपाटीवर पाणीपूरीतून,
प्रणयाचेच घास भरवू ।
रिक्षात मीटरला साक्षी मानून,
प्रेमाच्याच शपथा घेऊ ॥
आयुष्यातील सारी दु:खं,
जिच्या सहवासात टळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

द्वीधा मनं मग मध्येचं म्हणत,
आधी girl की आधी friend ।
आयुष्यभराचं नातं हवं,
का हवा one night stand ॥
देव करो तीच्याकडूनचं,
प्रेमाची ख्ररी व्याख्या कळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मधली सुट्टी होताच वॉटरबॅग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडुन शाळेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असु दे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराचं ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऑफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्या वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा
दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय

कधीतरी असेही जगून बघा.....

!

कधीतरी असेही जगून बघा.....

माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
"किती जगलो" याऐवजी "कसे जगलो"?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी काडीचा आधार होउन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते
त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले?
कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा!
चिमणीसारखा जन्म मिळाला असला तर काय झाले?
आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

आयुष्य रोजच वेगवेगळे रंग उधळते
त्या रंगांमधे आनंदाने रंगून तर बघा!
तसे जगायला काय?कुत्रे-मांजरीही जगतात हो
कधीतरी माणूस म्हणुन स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधून तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

प्रेम करणं सोपं नसतं

प्रेम करणं सोपं नसतं
सर्व करतात, म्हणून करायच नसतं
चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं
पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं
तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं
शाळा कॉलेजांत असच घडतं
एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं
अभ्यासाच्या पुस्तकात मग तिचच रुप दिसतं
जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं
ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं
करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं
सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं
हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं
पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं
फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं
मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं
डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं
आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं
एवढ सगळं करणं खुप कठीण असतं

जाते म्हणतेस हरकत नाही,

जाते म्हणतेस हरकत नाही,
काढत आश्रू पाहून जा.
नाते तोडतेस हरकत नाही,
वीज़ता श्वास पाहून जा.
जाणून सारे संपवताना
हीच एवढी वि न ती
हस्ते आहे हरकत नाही,
बुडती नाव पाहून जा.
जालते आहेस हरकत नाही,
जाळणारे गाव पाहून जा........

कर्जदार शेतकरी

निसर्गाचा हा कोप झाला शेतकरी हा कर्जदार बनला.
कर्ज फेडता फेडता हा शेवटी जमिनीवरच टेकला.

सन्साराचा हा गाडा पाठीवरती कर्जाने हा वाकुन गेला.
कर्ज फेडण्यासाठी हा शेवटी निसर्गावरती अवलनबुन राहीला.

नाही दिली साथ त्याला क्रुरकर्म्या निसर्गाने .
आत्महत्या करने हाच पर्याय निवडला त्याने .

बातमी छापुन आली जेव्हा ही पेपरात .
तेव्हा कळले सरकारला की शेतकरी मरतो आहे कर्जात.

वाचली बातमी मि तेव्हा वाटले काय गरीब जनतेचे होनार.
अजुन किती शेतकरी आत्मह्त्या करुन मरनार.

मिच विचारीतो मित्रहो तुम्हाला हे सारे केव्हा थाबणार.
शेतकरी बाधवाच्या आत्महत्या करने बन्द केव्हा होनार.

रात्र

रात्र अशीच जाते
तिच्या आठवणीने
चांदण्या मोजण्यात
आकाशात बघत
तिची वाट पाहण्यात
रात्री झोप लागत नाही
रात्र दिवसासारखी वाअगत नाही
घड्याळाच्या काट्यासोबत
वेळ नुसती पळत असते
माझ्यासोबत विनाकारण
रात्रसुद्धा तळमळत असते
जागं असेपर्यंत तिचे विचार
मनात घुटमळत असतात
बेधुंद मनाची पावलं
सैरावैरा पळत सुटतात
अचानक झोपेची चाहूल लागल्यावर
रात्री डोळे बंद झाल्यावर
नेहमीचाच सुरु होतो खेळ
कळत नाही कसा जातो वेळ
मग तिचा चेहरा येतो स्वप्नात
आणि स्वप्नातल्या तिच्या
हस-या ओठांना पाहून
मनातले विचार तिच्या
पाऊलखुणांचा मागोवा घेत
तिच्यामागे पळत सुटतात
आणि काळाचे भान न राहता
संपूर्ण रात्र जाते
इकडून तिकडे कुशी बदलण्यात
अखेर पहाटे शांत झोपेत
वेळेची घंटा झोपमोड करते
आणि अशा परिस्थितीत
रात्र अशीच निघून जाते!

असावं कुणीतरी आपलसं!

जीवनाच्या वाटेवरती
जीवलावून माझ्यावरती
जीवापाड प्रेम करणारं
असावं कुणीतरी आपलसं!
जिच्यासाठी जगावं
तिच्यासाठी मरावं
असं मला वाटणारं
असावं कुणीतरी आपलसं!
माझ्यावर रुसणारं
माझ्यासमवेत हसणारं
माझ्या चुका सावरणारं
असावं कुणीतरी आपलसं!
आयुष्याच्या वाटेवरती
प्रेमबंधाच्या उंबरठ्यात
माझी आतुरतेने वाट पाहणारं
असावं कुणीतरी आपलसं!
सुख दुःखांची सोबती होऊन
कठीण प्रसंगी धैर्य देऊन
मला योग्य मार्ग दखवणारं
असावं कुणीतरी आपलसं!
संकटांवर मात करुन
आयुष्यभराची साथ देऊन
माझ्यासोबत चालणारं
असावं कुणीतरी आपलसं!
माझा एकटेपणा दूर करुन
माझ्याशी प्रेमाच नातं जोडून
मलासुद्धा आपलं म्हणणारं
असावं कुणीतरी आपलसं!

तुझ्याविना!

स्वप्न आता डोळ्यात माझ्या
कधीच ते दिसणार नाही
ह्रदयातली जागा माझ्या
कधीच आता भरणार नाही
तुझ्याविना!
सोबतीत तुझ्या आनंदाला
पारावार माझ्या उरत नाही
विरहात मी तर एक क्षणही
आता जगणार नाही
तुझ्याविना!
तुझ्या समवेत सुंदरसे
मी एक स्वप्न पाहिले
स्वप्न ते माझे संसाराचे
वास्तवात उतरणार नाही
तुझ्याविना!
प्रेमात मी तुझ्यावरी भाळलो
प्रेमात तुझ्या मी एकटाच झुरलो
सोडून जाता तू मला
मीच माझा एकटा उरलो
तुझ्याविना!
प्रेमाचे ते सुंदर फुल
उमलते ह्रदयातूनी
ते फूल माझ्या ह्रदयातूनी
कधीच आता उमलणार नाही
तुझ्याविना!
धावून तुझ्या आठवणींपाठी
कविता मी रचली तुझ्याचसाठी
शब्दही माझे मुके पडले
काव्यालाही अर्थ उरलाच नाही
तुझ्याविना!
जेव्हा माझी घटका भरेल
अंतिम क्षणी एक इच्छा उरेल
त्या क्षणी तू भेटण्यास ये
अन्यथा मरण मजला येणार नाही
तुझ्याविना!
प्रेमात मजवर घात झाला
विरहाचा क्षण पदरी आला
पुन्हा विचार असला करणार नाही
मन कधीच कुठे वळणार नाही
तुझ्याविना!

नाते प्रेमाचे

या जगात नाही दुसरे

प्रेमाहुन निर्मळ नाते...

पण हेच नाते क्षणात आपुले

जिवन विस्कटून जाते

या नात्याला व्याख्या नाही

थोर सांगून गेले बरे

मात्र ते फार सुंदर असते!

हे विधान आहे खरे.

केव्हातरी मी हि केले होते,

जिवापाड प्रेम एकीवर.......

पण, माझ्या प्रेमाला तिचा

नकार आहे आजवर.

मला दु:ख नाही तिच्या

नकारार्थी उत्तराचे..

दु:ख वाटते ते तिच्या

प्रेमाच्या व्याख्येतल्या वासना आणि

निव्वळ टाईमपास या शब्दांचे....

तिला नाही कळला,

माझ्या एकतर्फी प्रेमाचा अर्थ...

तिच्यासाठी वेचलेले प्रेमाचे अनमोल क्षण,

ते सारे गेले व्यर्थ.

मी तिच्यावर आजही

मनापासून प्रेम करतो,

मनातले प्रेमभाव,

कवितेच्या रुपात वाहतो.

कळेल तिला माझ्या

एकतर्फी प्रेमाची व्यथा जेव्हा!

फार वेळ झाली असेल...

कारण, मी असेन देवाघरी तेव्हा!

Tuesday, August 28, 2007

प्रेमांकुर

ऐन तारुण्यात

आयुष्याच्या उंबरठ्यात

हळूवार भावनांची

साद कोणी घालत असतं......

डोळ्यांच्या साक्षीने

विश्वासाच्या सोबतीने

ऋदयात पवित्र नात्याचा

"प्रेमांकुर" जन्म घेत असतं.......

प्रेम

माझ्या प्रेमाची भाषा तुला नजरेतुन कळत नाही
अन प्रत्यक्ष व्यक्त व्हायला जिभ वळत नाही

तुला पाहण्यासाठी श्वास माझे अतुर होतात
तुझी वाट दिसताच मग पावले सुध्दा फितुर होतात

एक नव आकाश आहे चादण्याचे गाव आहे
चादण्याच्या याच गावाला प्रेम असे नाव आहे

तु फक्त साथ दे मी दुसरे काही मागत नाही
तु सत्यान जायचे वचन दे मी स्वप्न्नासाठी जगत नाही

माणुसकी कळण्यासाठी अगी माणुसपण याव लागत
त्यासाठी जिवनात एकदा तरी प्रेम हे कराव लागत

"साक्षात्कार"

आई म्हणाली,
"अरे, जशी सुखं असंख्य आहेत
तशीच दुःखंही असंख्य आहेत,
ते सर्वस्वी तुमच्या मानण्यावर असते रे!!!
तुझ्यासाठीचे सुख
कुणासाठीचे तरी दुःख असते,
अन कुणाचे तरी दुःख
तुझ्यासाठीचे सुख!!"

अगं पण तरी यातुन सुःख
आणि दुःख ओळखायचं कसं???
"वेड्या तेच तर शोधत जगायचं असतं
या निळ्या आभाळाखाली,
अन ते जर मानवाला ओळखता आले असते तर....."

अन साक्षात मला आईच्या रुपात पुन्हा 'दत्त' भेटले होते!"

एकदम विचारपुर्ण आणि परिपक्व कविता आहे निलेश,
देव आणि आईचे माध्यम साधून जीवनातील खर्या सुख- दु:खाची ओळख करुन दिलीस!

प्रेम म्हणजे प्रेम असतं - मंगेश पाडगांवकर

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी 'सेम' असतं !

काय म्हणता ? या ओळी चिल्लर वाटतात ?
काव्याच्या दॄष्टीने थिल्लर वाटतात ?
असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे !
तरीसुध्दा,तरीसुध्दा,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी 'सेम' असतं !

मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं;
'लव्ह' हे त्याचचं दुसरं 'नेम' असतं,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी 'सेम' असतं !

सोळा वर्ष सरली की,
अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात !
आठवतं ना ?
तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो,
होडीसकट बुडता बुडता वाचलो होतो !
बुडलो असतो तरीसुध्दा चाललं असतं;
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं!
तुम्हांला हे कळलं होतं, मलासुध्दा कळलं होतं.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी 'सेम' असतं !

प्रेमबिम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात !
असाच एकजण चक्क मला म्हणाला :
"आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही !
पाच मुलं झाली तरी प्रेमबिम कधीसुध्दा केलं नाही !
आमचं काही नडलं का ? प्रेमाशिवाय अडलं का ? "
त्याला वाटलं मला पटलं;
तेव्हा मी इतकचं म्हटलं,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं अगदी 'सेम' नसतं !

तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्ध-अर्ध खाल्लं असेल गोडीने
भर दुपारी उन्हात कधी तिच्या सोबत तासनतास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल.
प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतं सुध्द, निळं चांदणं सांडतं सुध्दा,
दोन ओळींची चिठ्ठीसुध्दा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुध्द प्रेम असतं.

बोलगाणी - मंगेश पाडगांवकर

मी मान्य करतो की

मी मान्य करतो की,
मी चुकलो असले.
पण अशा रीतीने स्वप्नाचे
सारे बंधन तोडायचे असतात का?
मला खंत विराहाची नाही....
तर ती आहे........
तू मला समजू न शकलायची
खर तर माज़च चुकले,
मी तुज़यात इतके गुंतायला नको होतो..........

प्रतेक वेळी मनात तुज़ी

प्रतेक वेळी मनात तुज़ी आढवन,
तुज़या साठी
पण का?.......
कोण जाणे दुसर्‍याही चाहूल लागली,
मनाची तडफड, काळजाची बेचेनि हळूवार वाढली,
मनाची ओळ पनाहवली,
डोळे अश्रू नयन झाले,

पुर्वी नव्हत ग अस काही,
तुझी भेट झाली.....
आणि सुखा सोबत दुखाची ओळख झाली,
आता तर अश्रूनी एवढ नाती केले
आता तर त्यानी माझाया डोळ्याना त्यांच
घर बनवले

" क्षण "

त्या वाटे वरुन तु येणार म्हणू,
त्या वाटे वरच तुझी वाट पाहतो,
तुझ्या ऐका क्षणाच्या भेढीसाठी,
मी तासंन तसं झुरत राहतो.

घड्याळाचा काटा ज़ेव्हा,
त्या क्षणाच्या ज़वळ येतो,
माज़्या ह्र्द्यात चंचल वादळ उडवून ज़ातो,
तुझ्या ऐका क्षणाच्या भेढीसाठी,
मी तासंन तसं झुरत राहतो.

तुझ्या चोर पावलांचा नाज़ुक आवाज़,
माज़्या कानांना हळुच ऍकु येतो,
तुझ्या ऐका क्षणाच्या भेढीसाठी,
मी तासंन तसं झुरत राहतो.

तुझे हळुच येणे,
मला पाहुन ही न पाहील्या सारखे,
हळुच डोळे खालि टाकणे, आणि,
त्य क्षणी तुझे गुलाबी गालातल्या गालात हसणे.
याच क्षण भराच्या हसण्यासाठी,
मी दरोज़ तुझी वाट पाहतो.
तुझ्या ऐका क्षणाच्या भेढीसाठी,
मी तासंन तसं झुरत राहतो.

त्या क्षणी,
कोणी आस पास न पाहुन,
तुज्याशी बोलण्याचा प्रयत्न मी करतो.
याच एका क्षणासाठी,
मी तासंन तास घेरटे घालतो.
तुझ्या ऐका क्षणाच्या भेढीसाठी,
मी तासंन तसं झुरत राहतो.

पण,
कधी कधी,
जेव्हा तु काही न बोलताच निघुन ज़ाते,
तेव्हा तो क्षण मला असंख्य वेदना देऊन ज़ातो.
तरी ही, त्या क्षणा भराच्या भेढीसठी,
मी तासंन तसं झुरत राहतो.

तु निघुन गेल्यावर,
तो क्षण ही निघुन ज़ातो,
माज़्या ज़गाण्याचा अर्थ,
सोबत घेऊन चातो, आणि,
दुसर्या क्षणासठी,
एकटे सोडुन ज़तो.

पण,
मी ही न हार मांता,
त्या क्षणाची परत वाट पाहतो.
तुझ्या ऐका क्षणाच्या भेढीसाठी,
मी परत तासंन तसं झुरत राहतो.

मराठी प्रपॉअज............

कॉलेजचे गेट
झाली तिथे भेट,
घुसली थेट मनात
देशील का मला डेट ?

मी रोगी तू दवा
तू फूगा मी हवा
ती चूल मी तवा
सांग तुला मी हवा?

तू तपकीर् मी चिमु ठ
तू साडी मी सूट
मी मोजा तू बूट
जमेल मेतकूत ?

तू धाप मी छाती
मी शनि तू साडेसाती
मी भूत तू भानामती
जुळतील का नाती ?

मी पेट्रोल तू गाडी
मी गवत तू काडी
मी विचार तू नाडी
जमेल का जोडा?

मे वरहवठा तू पाटा
तू संगणक मी दाता
तू टेलको मे टाटा
होतील का एक वाटा?

तू वाजंत्री मी ताशा
तू मिठाई मी माशा
तू बोली मी भाषा
ठुऊ का एवढी आशा?

मी पाणी तू घागर
मी च हा तू साखर
जोडा जमेल स त्वर ?

तुझ्या आयुष्य रेशेवर मी

तुझ्या आयुष्य रेशेवर मी
स्वप्नाचे इमले बाधले होते

सुख दुखाची विन घालून
स्वप्नाचे रंग भरले होते

आज स्वप्न आधुर राहीले
तुझे हात बळकट झाले

सुख दुखच्या सावली
साठी तुझे जग मोकळे झाले
आणि
या जगात मला परक्या सारखे
स्वतच्या प्रेमात कैद केले...

असे का करतेस या जिवा सोबत
हा तर केवळ तुझाच आहे ग वेडी........

तुच

पाहिले नाही मि तुला हे कधी
पण आहेस माझ्या तुच मनामधी

समजत नाही मजला आसे का घड्ते
विचार करताच माझे मन उदास हे होते

असे का घड्ते ते माझे मलाच कळेना
तुझ्या वाचून एक क्षण ही करमेना

डोळे झाकताच तु मजला दिसतेस
उघड्ल्यावर डोळे तु समोर ही नसतेस

कोन हे सतवते हे मजला
ख्ररोखर सान्ग तु तर नही सतवत ना मजला

ती

जाणिव जेन्व्हा झाली मला तिची तेन्व्हा सोबत हि माझ्या नव्हती
कारण मिच तिला जिवनात एकटी सोड्ली होती

चुक हि माझीच ति होती तिला मी विसरली होती
कधीच मि तिची आठ्वण हि काढली नव्ह्ती

माझ्यावरती रागवून ति घरी एकटीच बसली होती
कितीही प्रयत्न केले तरी ति माझ्या जवळ येत नव्ह्ती

काळ एकटा चालताना मि तिची मला जाणिव झाली
तेन्व्हाच मला प्रथम तिची आठ्वण झाली

तिला विसरण्याची मला निसर्गाकडून सजा मिळत होती
मित्रहो ती दुसरीकोणी नसुन ती माझी छ्त्री होती

तुझा शिवाय जगन आता

तुझा शिवाय जगन आता ,अगदी कळणार आहे,
आयुशाच्या वेडे वळण आशेकडेच व ळनार आहे,
तुझ आंगण , तुझ घर , भांडी देखील तुझीच ग,
तुझा कपाट , तुझा आरसा , उशी देखील तुझीच ग,
उशीवर आश्रू नाही हसत मावळणार आहे.
घर असते दोघांचे उगाच समजायचो मी,
सावलीत नाही पण उन्हात झुरायचो तुझसाठी,
सावलीत तू उभी राहा,उन्हात मी राहतो,
आज घर शांत आहे, आज मी ही शांत आहे,
दरावरच्या पडद्याना आशा उगीच जिवंत आहे,
आढवनीचा पडदा सारून, दार बंद करणार आहे,
कुणाच्या दुखंची कुणाला आता सल नाही,
कुणाच्या दुखाणी आता कुणाची तडफड होत नाही,
कुणा साठी कुणाचे डोळे झरत नाही,
कुणा साठी कुणाचे आंत:करण जळत नाही,
कुठे आहे असे पाय जिथे टेकवावे डोके.......
खर तर तुझाच पायावर डोक ठेऊन
प्रेम भरल्या स्वप्नात जायचे आहे.....
पण
इथे रेषमाला गिराहिक सारे पण खर्या काप साला कुठे भाव ???

आठवण

तु खुप देवुन गेली होतीस आठवणीच्या बरोबर
आज मलाच वाटत आपलच चुकल होत बरोबर

नात होत सन्पल तरी अजुनही ते टिकुन आहे
तुझ्या त्या आठवणीने ते अजुन ही भरून आहे

तुझ्या आठवणीची दुनिया ही वेगळीच होती
प्रत्येक विरहाच्या वाटेवरती मिच सदा अनोळखा आहे

सायन्काळी दिवस मावळताना तुझ्या आठवणी मनात दाटतात
दिवस उजडू लागताच त्याही मला सोडून दूर जातात

प्रगती

खालील कविता कोणावरही आधारित नाही क्रपया कुणीही गेरसमज करुन घेवू

२१ व्या शतकात सुध्दा भारत हा पाठीच राहीला.
प्रगती करण्यापेक्ष्या आवगती कडेच चालला.

भारताची सन्सक्रूती आपणच नष्ट केली.
अन आपणच म्हणे भारताची अमेरिका झाली.

साडी चोळीची जागा आता जिन्स प्यान्ट ने घेतली.
लान्ब लान्ब केसाच्या जागी आता ब्बाबकट स्टाईल आली.

सदरा धोतरचा जमाना नष्ट होत गेला.
मरायला टेकलेला म्हातरासुध्दा जिन्स घालू लागला.

आजची स्त्री मात्र झाशीची राणी व सावित्रीबाई फुले ना विसरली.
मात्र एश्वर्या राय व मलिका शेरावत याना केन्व्हाच नाही विसरली.

मग मलाच सान्गा मित्रहो कशी आपली प्रगती होणार.
कारण गाढवा मागून जाणारा हा गाढवच आसणार

आन प्रेम करायच राहुनच गेल होते.

प्रेम म्हणजे काय ते मला ठाऊक हे नव्हते.
कारण प्रेम करायच राहुनच गेल होते.

१६ व्या वर्षी पहिला प्रयत्न्न केला.मध्येच तेन्व्हा आभ्यास हा आला.
मिच म्हणालो नन्तर प्रेम करू.पहिले आधी दहावी पास हे होवू.
आन प्रेम करायच राहुनच गेल होते.

दहावी मि पास झालो होतो. अकरावीत प्रवेश घेतला होता.
पण त्यावेळी मला प्रेमाचा काहीच अभ्यास माहित नव्हता.
आन प्रेम करायच राहुनच गेल होते.

दिवस महिने जात होते एखादी तरुणी मजला भेटत हि नव्हती.
एखादीला विचाराव म्हटल तर तेवढी हिमत माझ्यात नव्हती.
आन प्रेम करायच राहुनच गेल होते.

वाट पाहत असता तिची १ वर्ष झाले होते.
माझे स्वप्न्न स्वप्न्नच राहिले होते.
आकरावी पास होवून मि बारावीत प्रवेश घेतला होता.
प्रेम करायला जमनार हे नव्हत बारावीचा अभ्यास म्हत्वाचा होता.
आन प्रेम करायच राहुनच गेल होते.

मनाला समजवले आपण बारावी पास झाल्यावर प्रेम करू.
प्रेम म्हणजे काय ते आपण बारावी झाल्यावर शिकू.
मि बारावी पास झालो होतो. आता मि कामाला जावू लागलो होतो.
काम आणि कॉलेज यातून वेळ मिळत नव्हता.
प्रेम म्हणजे काय ते शिकायला माझ्याजवळ वेळच शिल्लक नव्हता.

ति माझी

खरच ति आपणाला जिवनात हवी अशी वाटते.
थोडे दिवस का होईना तिची अपणाला गरज भासते.

हातात तिला घेवून चालताना खूप बरे वाटते.
सोबत ति असताना मन किती प्रसन्न वाटते.

घेवून जतो आपण जेन्व्हा हे फिरायला.
बरे वाटते सोबत तिच्या आपणाला भिजायला.

पाण्याचा प्रत्येक थेन्ब अन्गावर रोन्मास उभा करतो.
अशाच वातावरनात आपण तिला गोल गोल फिरवतो.

तिच्या सोबतचा प्रत्येक क्षण महत्वाचा वाटतो.
काहीतरी नविन तिच्याकडुन शिकत हे जातो.

तुम्हाला वाटले असेल मित्रहो ति माझी प्रियेसी होती.
नाही आहो ति तर माझी छत्री होती.

प्रेम कधी मागून मिळत नाही

प्रेम कधी मागून मिळत नाही
ते आतून जाणवावं लागतं,
नजरेतून कळलं तरी
शब्दांतून सांगावं लागतं...

रोज तुझी आठवण येते आणि
रोज डोळ्यांत पाणी उभं राह्तं,
तू जवळ हवीस असं वाटताना
खूप दूर आहेस,हे सांगून जातं...

कित्येकदा तुला सांगावसं वाटतं
पण शब्द ओठातच गुदमरतात,
पापण्यांची अबोल किलबिल होते
आणि शब्द डोळ्यांतच उमटतात...

माझ्या नजरेचा अथॅ तुला समजावा
म्हणून मी शब्दांची वाट धरली,
ते शब्द वाचूनही तू अबोध राहिलीस
या वाटेवर येऊन मी चूक तर नाही केली?

का,कोणासाठी इतके वाटावे?
का,कोणासाठी इतके झुरावे?
अनोळखी,तरीही परिचित असावे,
यालाच का "प्रेम" म्हणावे?

असं नातं आहे आपल्यात
जे आपल्या दोघांनाही सांगता येत नाही,
मनात भावनांची गुंफण होऊनही
शब्द् माञ ओठांत येत नाहीत...

एक प्रवास मैत्रीचा

एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा

प्रेमकरायच राहुनच गेले

आज मि तिला पाहिली होती.
माझ्या समोरून ति जात होती.
पुढे जाता जाता ति हळूच मागे
वळूण पाहत हि मला होती.

मला काहिच हे समजत नव्हते
ति का वळून पहात होती.
हळूच गाली हसूण ति कसलातरी
इशारा मजला करत हि होती.

मला तिचे इशारे काही
समजून हे येत नव्हते.
कारण असे माझ्या आयुष्यात
केन्व्हाच घड्ले नव्हते.

कारण आयुष्यात प्रेम करायच
राहूनच गेल हे होते.
प्रेमातील इशारे मजला कसे
हे समजनार ते होते.

चंदन"

चंदन"

कधी कधी असही जगायच असत.
कधी असही वागायच असत.

खोट्या आनंदाच्या पडद्याआद.
खर दुःख लपवायच असत.

काही आठवायच असत.
काही विसरायच असत.

मनाच्या मखमली पेटीत.
काही स्मृतींना जपायच असत.

दुःखातही आपल्या आसवांना.
डोळ्यात आणायच नसत.

हसतमुखान इतरांच सांत्वन
करायच असत

दिवा बनून प्रकाश देत जळत
रहायच असत.

चंदन बनून झीजत झीजत.
आयुष्य संपवायच असत.

कोवळी काळी सन्द्याकाळ

हिरव्यागार नशिबाची आज अचानक हिरवी पाने झड्ली.
थेन्ब हे पाझरून गेले दव फक्त उरली.

नशीब होत कोवल जेन्व्हा फ्ळे मधूर त्याने दिली.
सन्पले स्वर माझे तेन्व्हा हाक मि तुला दिली.

तरुण पणाच्या वेळी कधीच सन्कटाना भिक नाही घातलीस.
निघुन जरी गेलीस तु तरी आठवण हि कायम ठेवलीस.

दिवस कोवले नशिबातले फान्द्यावरती पडून गेले.
कोकीळा मनाच्या उडून गेल्या कावळेच मात्र हयात राहीले.

जगुन गेली मरुन गेली पर्णहीन बुन्द्याची आठ्वण.
कशी काय नशिबात येवून गेली कोवळी काळी सन्द्याकाळ.

Monday, August 27, 2007

MAZI SHALA

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

घन्टा व्हायची वाट का असेना
मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,
घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,

त्याचा अनुभव..

त्याचा अनुभव.. :-
उबदार श्वास माझे तुझ्या मानेवर फुललले..
तुझ्याच गळामिठित मग मी स्वत:च विरघळलेले..
स्पर्शाची उधळण तुझी मला थेंबाला जाणवत होती..
कोसळणार्‍या पावसापेक्षा मी तुझ्या लाजरसातच न्हाहत होती..
जलधारा देहावरूनी ओघळत तुझ्या ओठांवर स्थिरावत होत्या..
त्या अल्हाद गुदगुल्या मला शहारे आणत होत्या..
तुझं ते हरवंलेल रुप पाहुनी..
मी हि माझी क्षितीज तुझ्या मिठीत मुक्त केली..
पावसाची ती एक अनोखी आठवण म्हणून..
माझ्या ह्रिदयाची सारीच पाझरे तुझ्यावर रित केली...
अनोखा संगम त्या वर्षाविहाराचा घडी-घडीला आनंद वाढवत होता,
कुठला पाऊस अन कुठलं प्रेम आता फरक तरी कुठे जाणवत होता?

त्याचा अनुभव.. :-

तुझ्या केसांच्या बटा अन साडिचे ओले काठ..
माझी उत्कंठा प्रेमपर्वताच्या शिगेला पोहचवतं होत्या..
शरीरावरच्या बारीक लवांना खरोखर..
वार्‍यासवे डोलायला प्रेरीत करत होत्या...
तुझ्या हातांचे स्पर्श माझ्या सदर्‍यावर जाणवत होते..
तुला मिठीत घेताना माझ्या हातांना तुझ्या कमरेचे ऐकमेव स्थान होते..
तुला जवळ खेचताच तू डोळे मिटूनी
मनातल्या मनात पावसाचे आभार मानलेस..
अन अलगद माझ्या ओठांचे आधार आपलेसे करून घेतलेस..
अन मग सुरु झाले ते पावसातले रासमिलन..
सारे काही अजब घडले अन सफल ते प्रेमजिवन..

सजनी

सुंदर नाजूक उठून दिसेल ती,
गालावर सुरेख खळ पडून ह सेल ती,
कारण नसताना खोटी च रुसेल ती,
काय माहीत कशी असेल ती !
एकुलती एक सर्वात थोरली असेल ती,
नाहीतर कदाचित धाकटि असेल ती,
संसार कसा संभाळेल ती,
काय माहीत कशी असेल ती !
फॅशेन करील की संस्कृती पाळेल ती,
परंपरा जोडेल की परंपरा तोडेल ती,
संसाराचा पसारा कसा आवरेल ती,
काय माहीत कशी असेल ती !
थोडी नखरेल असेल का ती,
हुशार समजूतदार सुगरण असेल का ती,
एक संमज्स अर्धांगिनी शोभेल का ती,
काय माहीत कशी असेल ती !
एवढ छोट आयुष्य सहज जागेल का ती,
आभाळ एवढ दुख सहज सोसेल का ती,
दुखात ही न तुटता हसेल का ती,
काय माहीत काही असेल ती !!!!!!

फक्त तुझ्यासाठी

फक्त तुझ्यासाठी
आयुष्य असेच सरले , धावत आठवणींच्या पाठी
सबंध आयुष्य वाट पाहत , मी फक्त तुझ्यासाठी
तुझ्या येण्याची वाट पाहत , शब्द गोठले आज ओठी
मनात दुखाचे भास कळवले, मी फक्त तुझ्या साठी
जगलो असा की मी , जगणे राहून गेले पाठी
डोल्यातील अश्रू मनात कोंडाले , मी फक्त तुझ्यासाठी
तुझ्यासमोर झुकते मन , हे मन ही आहे फार हाटी
याच हा टी मुळे आयुष्य बेतले, मी फक्त तुझ्याचसाठी
नशीबाची झगडत झगडत ,न तोडता प्रेमाची गाठही
त्या गाठही संभाळुन ठेवली, मी फक्त तुझ्यासाठी
एक एक क्षण तुझ्या प्रेमाचा , आज डोळ्यात दाति
त्या क्षणाना उराशि कवतावले , मी फक्त तुझ्यासाठी
अंधार विजत उजेड यावा , भान विसरून जुलावी मिठी
याच स्वप्नं ना आयुष्य समजले , मी फक्त तुझ्यासाठी
तुझीच वाट पाहत , जळाले मन प्रेमसाठी
भिन्न दिशाना झुरत राहिलो, मी फक्त तुझ्यासाठी

प्रेमसाठी

प्रेमसाठी
वाटले नव्हते मन तुटले तर
एतक दु:ख सोसावे लागेल
आज पर्यंत श्वासाणी मला. पण या पुढे पोसावे लागेल त्याना


तुझ्या आठवणी च्या साखर झोपेत माझी
कालची रात्र गोडाव्यात सरली
पुर्वी स्वप्नाच्या जात्रेत मन जायाच
पण काल स्वपनानीच मनात जत्रा भरली

" प्रेम"........शब्द दोन आक्षरांचा
नुसता एकला तरी हर्ष होतो
आणि उच्चारला तर
दोन ओटा मधे स्पर्श होतो

तुझ्या डोल्यातील इवलसा आसु
मला समुद्रा हून खोल वाटला
कारण मीच होतो म्हणून
माझ्या डोळ्यात समुद्र दाटला

माझा दु:ख बघावल नाही
म्हणून एक ढग रडत होता
तुमच आपला काही तरीच
म्हणे तेव्हा " पाउस " पडत होता !!!!!

श्रावणी सोमवार

श्रावणी सोमवार
करि अभिषेक शंकराचा
पाउस मुसळधार
भक्तिच्या सरीत भिजतो
श्रावणी सोमवार..

साफां-पगडी बांधुन
धारिला गळ्यांत सर्पहार
दर्शन देण्यास निघाले
केलासपति नंदीवर सवार..

पूजा-अर्चना-उपवास
करती नर-नार
विशेष इच्छापूरती साठी
धरला व्रत सोळा-सोमवार..

घरो-घरी आज
ब्राह्मण देव जेवणार
मनोभावे पूजियला देव
महादेव सर्वांना पावणार...

ओळखलत का मुलीँनो मला!!!!!!!

ओळखलत का मुलीँनो मला
'गुलाबासह' आला कोणी,
केस होते सलमानसारखे
कानात होती त्याच्यासारखी बाळी

क्षणभर बसला
नंतर हसला
बोलला शर्ट काढुन
’ काल तुझा भाऊ भेटला
गेला बरगड्या तोडुन,

गाढवाला मारल्यासारख
खालुन- वरुन चोपल
रिकाम्या हाती जाईल कसा
अँतर्वस्त्र तेवढे वाचल!!

चपले कडे हात जाताच
तावा - तावात बोललो,
चप्पल,बुट नको मुळी
फ़क्त ड्रेस तेवढा पाढवा!!

मोडुन पडली प्रेम स्टोरी
तरी मोडला नाही चाळा
एखादी ’ बीन भावाची ’ पोरगी असेल तर...
तेवढ नक्की कळवा....

कऑलेज कट्टा...भाग १

कऑलेज कट्टा...
गणीताच्या तासाला बसने
ही जरी एक सजा आहे
नवीन madam ला पहात बसणँ
यातही थोडी मजा आहे!!!!!

स्टाफ़रुम मधुन सराँची
madam वर नजर
आणी,दाराआडुन बघायला
सारे कट्टेकरी हजर......

सँध्याकाळ झली की,
सगळे कट्ट्यावर हजर
आणी समोरच्या ’फ़ीगरवर्क’ वर
प्रत्येकाचीच नजर.......

आम्हाला psychology शीकवनारी
एक सुँदर miss आहे
सर म्हनतात,कऑलेजम्ध्ये फ़क्त
तेवढाच चाँगला ’पीस’ आहे.......!

कऑलेजम्ध्ये कुनी नाही पटली
तर गल्लीत आपली ’माल’ आहे
कट्ट्यावरचा प्रत्येकजनच तसा
थोडाबहुत चालु आहे....!

एक नवीन ऋतू

एक नवीन ऋतू आला
आपल्या नवीन प्रेमा मधे,
एक नवीन उत्साह सळसळला
आपल्या नवीन प्रेमामधे,
आपण दोघेही नवीन होतो
आपल्याच नवीन प्रेमामधे,
एकांतातही तल्लीन होतो
आपल्याच नवीन प्रेमामधे,
पावसालाही पडाव वाटले
आपल्याच नवीन प्रेमामधे,
कायमचा मुक्काम करावसा
आपल्या नवीन प्रेमामधे,
आपणही प्रेमळ...सामावून घ्यावे
आपल्याच नवीन प्रेमामधे,
मन पावसाचे भरूण आले
आपल्याच नवीन प्रेमामधे......

तू

तुझ्यावर खूप दिवसापासून लिहायचे म्हणतो
पण तुझ्या साठी शब्द सापडत नाही
तुझा विषय निघाला की शब्द हरवतात
कारण तेव्हा मी , मी नसतो , आस्म्नतात तुला शोधत भरकटत असतो.

पण नेहमीप्रमाणे निराशा होते
हातातली सिगरेट पुन्हा भाणावर आणते

तू नसूनही कायम बरोबर असते
सुख दु:खाच्या हर एक क्षणी खांद्याला खांदा लावून असते
आनंदाच्या वेळी तुझा बेभानपणा भासतो
निराश मनाची समजूत काढणारी तूच असते

तुज़ी प्रतिमा मी रोज रंगवत असतो
तुझ्याशी मी बोलतही असतो
थट्टा , मस्करी आणि भांडनही होते

तरी तू कोण आहेस? कुठे आहेस? काही आहेस?
एक ना अनेक प्रश्न अजूनही अनूत्तरीत आहेस
पण एक दिवस तू समोर येणार आणि
तेव्हा मात्र शब्दांचा पाउस मुसळधार बरसनार.....