Tuesday, August 28, 2007

आन प्रेम करायच राहुनच गेल होते.

प्रेम म्हणजे काय ते मला ठाऊक हे नव्हते.
कारण प्रेम करायच राहुनच गेल होते.

१६ व्या वर्षी पहिला प्रयत्न्न केला.मध्येच तेन्व्हा आभ्यास हा आला.
मिच म्हणालो नन्तर प्रेम करू.पहिले आधी दहावी पास हे होवू.
आन प्रेम करायच राहुनच गेल होते.

दहावी मि पास झालो होतो. अकरावीत प्रवेश घेतला होता.
पण त्यावेळी मला प्रेमाचा काहीच अभ्यास माहित नव्हता.
आन प्रेम करायच राहुनच गेल होते.

दिवस महिने जात होते एखादी तरुणी मजला भेटत हि नव्हती.
एखादीला विचाराव म्हटल तर तेवढी हिमत माझ्यात नव्हती.
आन प्रेम करायच राहुनच गेल होते.

वाट पाहत असता तिची १ वर्ष झाले होते.
माझे स्वप्न्न स्वप्न्नच राहिले होते.
आकरावी पास होवून मि बारावीत प्रवेश घेतला होता.
प्रेम करायला जमनार हे नव्हत बारावीचा अभ्यास म्हत्वाचा होता.
आन प्रेम करायच राहुनच गेल होते.

मनाला समजवले आपण बारावी पास झाल्यावर प्रेम करू.
प्रेम म्हणजे काय ते आपण बारावी झाल्यावर शिकू.
मि बारावी पास झालो होतो. आता मि कामाला जावू लागलो होतो.
काम आणि कॉलेज यातून वेळ मिळत नव्हता.
प्रेम म्हणजे काय ते शिकायला माझ्याजवळ वेळच शिल्लक नव्हता.

No comments: